Blog

बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास गिरणी कामगारांसाठी म्हाडा लॉटरी २०२० मध्ये अपात्र असलेल्या अर्जदारांच्या पुढील प्रक्रियेबाबत माहिती

December 21, 2022 5:39 pm

मुंबई मंडळाने दि. ०१/०३/२०२२ रोजी गृहनिर्माण भवन, वांद्रे (प), मुंबई-५१ येथे एकुण ०३ (२८-BOMBAY DYING (SPRING MILL), २७-BOMBAY DYING TEXTILE MILL आणि ५२-SHRINIWAS MILL) गिरण्यांची संगणकीय सोडत काढली होती. त्यानंतर ०२ जुलै २०२१ रोजी म्हाडाने विजेत्यांना प्रथम सूचना पत्र दिले आहे. प्रथम सूचना पत्रातील सूचनेनुसार विजेत्यांनी सबंधित मुंबई जिल्हा बँकेत कागदपत्रे जमा केले आहेत.  

उपरोक्त योजना गिरणी ०१/०३/२०२२ मधील यशस्वी झालेले अर्जदाराना सोडतीमध्ये पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रांची / प्रमाणपत्रांची प्राधिकृत अधिकारी यांच्या चमूमार्फत छाननी केली असता, काही अर्जदाराना अपात्र ठरविण्यात आले आहे. उदाहरणार्थ पुढील कारणांसाठी म्हाडाने अपात्रतेचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे योजनेतील सदनिका आपणांस वितरीत करता येणार नाही.

१. वारस प्रमाणपत्र (legal hair certificate)

२. पंजीकृत हक्कसोडपत्र (Registered Release Deed)

३. ना-हरकत प्रमाणपत्र ( Consent Affidavit)

४. हमीपत्र (Undertaking)

५. क्षतिपूर्तीबंधपत्र (Indemnity Bond)

वरील कारणामुळे म्हाडाने अपात्र अर्जदारांना अपिल करण्याची संधि दिली आहे. सदरहू अपात्रतेच्या निर्णयावर आपणास अपिल सादर करावयाचे असल्यास आपण पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी/वेळेत सदर योजना संकेत क्रमांकासाठी नियुक्त केलेले संबंधित अपिल अधिकारी यांच्या कडे पुढील पत्त्यावर अपिल सादर करावे.

म्हाडाने कळविले आहे की अपात्र अर्जदाराना १५ दिवसांच्या आत अपिल सादर न केल्यास, आपणांस गिरणी कामगारांच्या सोडतीमध्ये सदनिका मिळण्याच्या दृष्टीने अपिल करण्यास स्वारस्य नाही असे समजून आपला अर्ज रद्द करून आपणास अंतिमतः अपात्र ठरविण्यात येईल व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारास संधि देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

दि. १५/१२/२०२२ रोजी म्हाडाने अपात्र झालेल्या अर्जदारानंसाठी अपिल पत्राचे स्वरूप mhada.gov.in येथे प्रकाशित केलेले आहे.

आम्ही तुम्हाला याद्वारे सूचित करतो की वरील माहिती तुम्हाला कायदेशीर सल्लामसलत करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करण्यात येईल. तसेच तुम्हाला सर्वोत्तम कायदेशीर शक्यता आणि पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे यांचे मार्गदर्शन करू. कोणत्याही प्रकारच्या प्रश्नासाठी किंवा कागदपत्र मदतीसाठी contact@legalsight.in वर मेल करावा.

अस्वीकारण/नोंद घ्यावी : वरील ब्लॉग माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावरील सार्वजनिक सूचना द्वारे संकलित केलेली आहे. हा ब्लॉग/वेब साइट वकील किंवा लॉ फर्म प्रकाशकाने तुम्हाला सामान्य माहिती आणि म्हाडा प्राधिकरणाकडून सामान्य अपडेट्स देण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट कायदेशीर सल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्यासाठी नाही. ही ब्लॉग साइट वापरून तुम्ही समजता की तुम्ही आणि ब्लॉग/वेब साइट प्रकाशक यांच्यात कोणताही वकील ग्राहक संबंध नाही. तुमच्या राज्यातील परवानाधारक व्यावसायिक वकीलाकडून सक्षम कायदेशीर सल्ल्याचा पर्याय म्हणून ब्लॉग/वेब साइट वापरली जाऊ नये.